Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG !! ​‘ठग आॅफ हिंदुस्तान’मधून आमिरची ‘मुलगी’ झाली आऊट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 13:29 IST

‘दंगल’ सुपरहिट झाला आणि सोबतच या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुपरडुपर हिट झाली. आम्ही आमिर खानबद्दल नाही तर त्याच्या आॅनस्क्रीन ...

‘दंगल’ सुपरहिट झाला आणि सोबतच या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुपरडुपर हिट झाली. आम्ही आमिर खानबद्दल नाही तर त्याच्या आॅनस्क्रीन मुलींबद्दल हे बोलतोय. होय, आमिरची आॅनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख ‘दंगल’ रिलीज होऊन तीन महिने झाले तरी चर्चेत आहे. चर्चा कशाची तर ‘ठग आॅफ हिंदुस्तान’मध्ये ती आमिरसोबत स्क्रीन शेअर करणार याची. पण आता फातिमा आणि फातिमाच्या चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरणारी एक बातमी आहे.मीडिया रिपोर्टनुसार, ‘ठग आॅफ हिंदुस्तान’चा निर्माता आमिर खान याने आपल्या चित्रपटात फातिमाला घेण्यास नकार दिला आहे. या बिग बजेट सिनेमाच्या एका ड्रिम सीक्वेंससाठी आमिरने फातिमाचे नाव सुचवले होते. पण आदित्यने आमिरची ही शिफारस फारशी गंभीरपणे घेतली नसल्याचे कळतेय.ALSO READ : ‘दंगल’ गर्लचा पहा सुपरहॉट अंदाज ‘ठग आॅफ हिंदुस्तान’ची कथा स्वातंत्र्यापूर्वीच्या ठगबाजांवर आधारित आहे. अ‍ॅक्शन आणि थ्रीलरने भरलेल्या या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘ठग आॅफ हिंदुस्तान’मधील भूमिकेसाठी सर्वात आधी आलिया भट्ट आणि वाणी कपूरचे नाव चर्चेत होते.  आलियाच्या नावावरून आमिर आणि आदित्य चोप्रा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचीही चर्चा होती. आमिरला या चित्रपटात आलिया हवी होती. तर आदित्य चोप्रा याला वाणी कपूर. अर्थात डेट्स जुळत नसल्याने आलिया स्वत: या चित्रपटातून अंग काढून घेतले. उरली वाणी कपूर तर तिनेही मी या चित्रपटात नाही, असे साफ जाहिर केले. त्यानंतर श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा सुरु झाली. श्रद्धाने या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिल्याचेही सांगितले गेले. केवळ श्रद्धाच नाही तर ‘कुमकुम भाग्य’फेम मृणाल ठाकूर हिचे नावही समोर आले. यानंतर फातिमा यात दिसणार, अशी बातमी आली. पण आता ती सुद्धा आऊट झाली. अद्याप तरी या चित्रपटातील फिमेल लीड ठरलेली नाही. आता कुणाची वर्णी लागते, ते बघूच.