Join us
Daily Top 2Weekly Top 5

​परीच्या आयुष्यात परतले जुने प्रेम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 20:15 IST

बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली परिणीती चोपडा हिच्या आयुष्यात तिचे जुने प्रेम परतले आहे. होय, आम्ही बोलतोय ते डायरेक्ट मनीष शर्मा याच्याबद्दल. ...

बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली परिणीती चोपडा हिच्या आयुष्यात तिचे जुने प्रेम परतले आहे. होय, आम्ही बोलतोय ते डायरेक्ट मनीष शर्मा याच्याबद्दल. मनीष शर्मा हा परिणीतीच्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती होती आणि आता मनीष पुन्हा परिणीतीच्या आयुष्यात परतल्याची चर्चा आहे. मनीष व परिणीत दोघेही अनेक वर्षे परस्परांना डेट करताना दिसले होते. एका प्रॉडक्शन हाऊससाठी दोघेही काम करून चुकले आहेत. एका नव्या बातमीनुसार, त्याच प्रॉडक्शन हाऊसने आपल्या एका चित्रपटासाठी दोघांनाही साईन केले आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर काहीच आठवड्यात मनीष व परी पुन्हा एकमेकांत गुंतू लागल्याचे दिसत आहे. एका बातमीनुसार, परिणीती आणि मनीष दोघांचीही एकमेकांच्या घरी ये-जा वाढली आहे. बरेचदा परिणीती मनीषच्या केबिनमध्ये दिसतेयं..आता प्रेम परत मिळाले असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे..कदाचित परिणीतीलाही हा आनंद जाणवू लागला असावा..