Join us  

अरेच्चा...! सोनम कपूरनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव... जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 10:48 AM

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. काय असेल हे सरप्राईज जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... तिने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नाव बदलून 'झोया सिंह सोळंकी' असे ठेवले आहे. तिने स्वतःचे नाव बदलले त्याचे कारण काय असावे. असा प्रश्‍न आता सगळ्यांना पडला असेल. त्यासाठी सोनम कपूर आणि दलकर सलमान यांच्या आगामी 'झोया फॅक्‍टर' चित्रपटाबाबत जाणून घ्यावे लागेल. या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून अनुजा चंद्राच्या 'झोया फॅक्‍टर' या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे.

'झोया फॅक्‍टर' चित्रपटासाठीच सोनम कपूरने सोशल मीडियावरच्या आपल्या अकाउंटमध्ये बदल केला आहे. आता सगळ्या नेटवर्किंग साईटवर सोनमच्या प्रोफाईलचे नाव झोया सिंह सोळंकी असे दिसणार आहे. लग्न झाल्यावर काही महिन्यांपूर्वीच सोनमने ट्विटर हॅन्डलवरील नाव सोनम कपूर बदलून सोनम आहुजा असे केले होते. आता त्यात पुन्हा बदल केला गेला आहे. हा बदल केवळ झोया फॅक्‍टरच्या प्रमोशनसाठी केला गेला आहे. 

सोनमचा नुकताच 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तिचे वडील म्हणजेच अभिनेता अनिल कपूर व ती एकत्र रुपेरी पडद्यावर झळकली. या चित्रपटात ते दोघे बापलेकीच्या भूमिकेत दिसले. यात त्यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली. तरी देखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. समलैंगिक संबंधावर आधारीत असलेल्या या चित्रपटात सोनम व अनिल कपूर यांच्याशिवाय राजकुमार राव व जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूरएक लडकी को देखा तो ऐसा लगाराजकुमार राव