Join us  

अरे बापरे...! ९६ किलो वजन घटवून सारा अली खान बनली ग्लॅमरस, हा आहे तिचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 3:03 PM

सारा अली खान हिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा' चित्रपटात झळकली.

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा' चित्रपटात झळकली. या दोन्ही चित्रपटातील तिचे काम रसिकांना खूप भावले. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करायच्या आधीच तिच्या सौंदर्यांच्या चर्चेला उधाण आले होते. कारण एकेकाळी सारा खूप लठ्ठ होती. तिचे ९६ किलो वजन होते. तिने कठोर परीश्रम करून तिच्यात बदल केला आहे. त्यामुळे आता तिच्या स्टाईल व परफेक्ट फिगरवर चाहते खूप लट्टू आहेत.  

साराने ग्रॅज्युएशनला शेवटच्या वर्षात असताना सलाड, सायकलिंग करून वजन घटविले आहे. तिने तिच्या फिटनेसबद्दल व्होग मासिकात सांगितले. सारा म्हणाली की, मी ग्रॅज्युएशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. कॉलेज सुरू झाले तेव्हा माझे वजन ९६ किलो होते. त्यावेळी मी फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष देत होती. पण शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात मी वजन कमी करण्याचे ठरवले. पिझ्झावरून सलाडवर आली आणि आळस सोडून मेहनत करायला सुरूवात केली. 

पुढे तिने सांगितले की, 'न्यूयॉर्क शहरात फिटनेसशी संबंधीत अनेक क्लास होते. तिथे फंक्शनल ट्रेनिंगपासून बॉक्सिंग आणि सायकलिंग उपलब्ध होते. माझे वजन खूप जास्त असल्यामुळे मी हेव्ही वर्कआउट करू शकत नव्हते. त्यामुळे मी सायकलिंग, वॉकिंग आणि ट्रेडमिलवर पळणे सुरू केले. यामुळे माझे वजन खूप कमी झाले.'

'मी ही वर्कआउटला माझे रुटीन बनवले आणि हेव्ही वर्कआउट करणे सुरू केले. त्यासोबतच बॉक्सिंग, कार्डियो आणि फंक्शनल ट्रेनिंगची सुरूवात केली. मी दररोज एक ते दीड तास वर्कआउट करायचे. रविवारी सुट्टी घ्यायचे. 

साराने बारीक होण्यासाठी केलेली मेहनत खरेच कौतुकास्पद आहे.

आता सारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत लव आज कल२मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथसिम्बा