Join us  

अरे देवा ! करण जोहरने या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा फोटो लावला त्याच्या बेडरूममध्ये, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:16 PM

सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले होते. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे.

करण नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्याबाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक उत्सुकता असते. करणचा एक किस्सा वाचून भल्या भल्यांची बोलती बंद होत आहे. ते म्हणजे करणच्या बेडरूमध्ये चक्क शाहरूख खानची पत्नी गौरी खानचा ग्लॅमरस फोटो लावला आहे. खुद्द करणनेच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्का सांगितला होता.  

 

 

करण जोहर तसं शाहरूख आणि गौरीसह खूप चांगली मैत्री आहे. मध्यंतरी करण शाहरुची लेक सुहाना खान आणि मुलगा आर्यन खानला  बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याच्या चर्चा होत्या. यावरून करण आणि शाहरूख गौरीमध्ये किती घट्ट आणि जवळीक आहे हे स्पष्ट होते. 

 

करणला नेहमीच लग्न हा विषय निघताच ट्रोल केले जाते. मध्यंतरी दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहून करणचा मूड बदलला की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. ''उफ्फ, मलाही आता लग्न करायचे आहे'' अशी कमेंट करणने दीपवीरच्या एका फोटोला दिली होती. आजवर करणने लग्न करणारच नाही असं बऱ्याचदा म्हटलं होतं. मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने करणचे फॅन्स खूश झाले होते. करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोन मुसांचा बाप आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे. करणने आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस ८ फेब्रुवारीला साजरा केला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर  करण जोहरवर आरोप केले गेले. याचा परिणाम त्याच्या इमेजवरही झाला आहे. सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले  होते.  त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे.

टॅग्स :करण जोहरगौरी खानशाहरुख खान