राजकुमारने पत्रलेखासोबतच्या नात्याबाबत केले 'हे' वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 12:29 IST
आपल्या कामाला घेऊन बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव नेहमीच चर्चेत राहतो, त्याच्या सगळ्या चित्रपटात त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, ...
राजकुमारने पत्रलेखासोबतच्या नात्याबाबत केले 'हे' वक्तव्य
आपल्या कामाला घेऊन बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव नेहमीच चर्चेत राहतो, त्याच्या सगळ्या चित्रपटात त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, तो पत्रलेखाबरोबर असलेल्या नात्याबद्दल नेहमी मोकळेपणाने बोलला आहे. एक मुलाखतीत राजकुमार आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाला की, "होय, आमच लग्न होणार पण आम्ही अजून तारीख निश्चित केली नाही आहे, आम्ही लग्नासाठी घाई करणार नाही आहोत सध्या आम्ही आमच्या करिअरवर लक्षकेंद्रित केले आहे."पुढे त्याला विचारले की तू लग्न आणि त्यातील रिती रिवाज ह्याला की मानतोस का? राजकुमार ने ह्यावर सांगितले की, "ह्याचे उत्तर देणे माझ्यासाठी फार अवघड आहे, मला वाटते नात्याचा अर्थ एकेमेकांबरोबर आनंदी राहणे आणि मला विश्वास आहे की सगळेजण असेच करतात' आता तुम्ही मलाच बघा मी आणि चित्रलेखा गेल्या सहाकिंवा त्याहून जास्त वर्षांपासून एकत्र आहोत आणि आम्ही एकमेकांबरोबर आनंदी आहोत आणि आम्ही लग्न केल्यानंतरही खुश राहणार, मी काही अशा लोकांना ओळखतो ज्यांनी लग्न नाही केले पण ते एकत्र राहतात आणि एकमेकांबरोबर खुश आहेत.''राजकुमारच्या म्हणण्यानुसार "असे नाही आहे की आम्ही लग्नाचा विचार नाही करत आहोत पण आम्हाला त्याचा तणाव आता नाही घ्यायचा , मला माहित आहे लग्न होणार आणि आमच्या कुटुंबीयांची सुद्धा हीच इच्छा आहे पण ह्या गोष्टीवरून ते आमच्यावर कधीच दबाव टाकत नाही.सध्या राजकुमार हॉरर कॉमेडी 'स्त्री' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. या चित्रपटाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. चित्रपटाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.