Join us  

Nysa Devgan VIDEO : इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग? कॅमेरा पाहून काजोलच्या लेकीने दाखवला अ‍ॅटिट्यूड, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:31 AM

Nysa Devgan Christmas Bash 2022 : काल रात्री न्यासाने ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट केली. पार्टी संपल्यानंतर न्यासा रेस्टॉरंट बाहेर आली आणि सगळे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. मग काय...

अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. अद्याप न्यासाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. 19 वर्षांची न्यासा सध्या विदेशात शिकतेय आणि सध्या मुंबईत आहे. मग काय चर्चा तर होणार. काल रात्री न्यासाने तिचे मित्र ऑरी, सैफ अली खानचा लाडला इब्राहिम अली, अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपालसोबत ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट केली. पार्टी संपल्यानंतर न्यासा रेस्टॉरंट बाहेर आली आणि सगळे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. मग काय, पुन्हा एकदा न्यासा ट्रोल झाली.

पार्टीनंतरचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हे व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी न्यासा नशेत असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्या अ‍ॅटिट्यूडवर टीका केली.

व्हिडीओत न्यास पिंक कलरच्या बॉडी हगिंग ड्रेसमध्ये दिसतेय. रेस्टॉरंट बाहेर पडताच न्यासाला कॅमेºयात कैद करण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. आधी तर न्यासा घाबरली. पण मग तिने असे काही नखरे दाखवले की, लोकांनी तिला ओव्हर अ‍ॅक्टिंग न करण्याचा सल्ला दिला. अरे इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग का करतेय ही..., अशी कमेंट एका युजरने केली. न्यासा आणि जान्हवी या दोघी बॉलिवूडच्या पुढच्या रवीना आणि टिष्ट्वंकल आहेत, अशी खोचक कमेंट अन्य एका युजरने केली.

20 एप्रिल 2003 रोजी जन्मलेली काजोल व अजयची लेक न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. 

टॅग्स :काजोलअजय देवगणबॉलिवूडनाताळ