Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता कंगना राणौतने राकेश रोशनवर साधला निशाणा; केले खळबळजनक वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:04 IST

गेल्यावर्षी न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या कंगना राणौत आणि हृतिक रोशन प्रकरणात आता पुन्हा एकदा शाब्दीक युद्ध रंगले आहे. कंगना गेल्या काही ...

गेल्यावर्षी न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या कंगना राणौत आणि हृतिक रोशन प्रकरणात आता पुन्हा एकदा शाब्दीक युद्ध रंगले आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून हृतिकवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याने दोघांमधील वादाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपासून सातत्याने हृतिकवर हल्ला करणाºया कंगनाने यावेळी मात्र हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने ‘हृतिकनेच नव्हे तर त्याच्या वडिलांनीही माझी माफी मागायला हवी’ असे खळबळजनक वक्तव्य केल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कंगनाच्या मते, तिची लढाई अद्यापपर्यंत संपली नाही. जोपर्यंत हृतिक आणि त्याचे वडील राकेश रोशन माझी सार्वजनिकरीत्या माफी मांगत नाही, तोपर्यंत मी यावर वक्तव्य करीतच राहणार आहे. कंगनाने याच मुद्द्यावर सीएनएन-न्यूज१८ वरील ‘नाऊ शोइंग’ या कार्यक्रमात चर्चा घडवून आणली. चॅनेलला दिलेल्या वक्तव्यानुसार कंगनाने म्हटले की, राकेश रोशन माझी आणि हृतिकची एक भेट घडवून आणणार होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. कंगनाच्या मते, ती अजूनही या प्रकरणाकरिता हृतिकशी आमना-सामना करायला तयार आहे. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मी थेट बोलू इच्छिते, परंतु हृतिक माझ्यापासून दूर पळत आहे. तो स्वत:ला माझ्यापासून लपवित असल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.  याच विषयावर पुढे बोलताना कंगना म्हणाली की, त्याने (हृतिक) आणि त्याच्या वडिलांनी स्वत:ला मूर्ख म्हणून सिद्ध केले आहे. त्यामुळे या दोघांनीही माझी माफी मांगायला हवी. जर त्यांनी असे केले नाही तर मी जगाला सांगणार की, हे प्रकरण नेमके काय आहे. अजून हे प्रकरण संपलेले नाही. ते दोघे काहीही सिद्ध करू शकणार नाहीत. दरम्यान, दोघांमध्ये वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा कंगनाने हृतिकचे नाव न घेताच सांकेतिक भाषेत त्याला ‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हटले होते. एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, ‘मला हे कळत नाही की, तुमचे लक्ष स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी माझा एक्स बॉयफ्रेंड मूर्खपणाच्या गोष्टी का करीत आहे? यावेळी कंगनाने हृतिकवर गोपनीय ई-मेल आणि तिच्या फोटोंचा दुरुपयोग केल्याविरोधात न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हृतिकनेही सायबर गुन्हे शाखेकडे दावा दाखल केला होता की, कोणीतरी दुसराच माझ्या नावाचा ई-मेल आयडी तयार करून कंगनाला ई-मेल करीत आहे. त्यावेळी कंगनाने म्हटले होते की, हृतिकने माझ्याबाबतील अनेक गोष्टींबाबत दावा केला आहे; परंतु एकही तो अद्यापपर्यंत सिद्ध करू शकला नाही. मी आतापर्यंत शांत राहिली, कारण मला रोशन परिवाराला समजून घ्यायचे होते. या परिवाराने अद्यापपर्यंत मी केलेल्या एकाही आरोपांचे खंडन केले नाही. कारण ते खोटे आहेत, त्यांच्याकडे सिद्ध करण्यासारखे काहीच नसल्याचेही तिने स्पष्ट केले.