Join us
Daily Top 2Weekly Top 5

Now it's confirm! ​करिना कपूरने दिला गोंडस मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 12:44 IST

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरात एका गोंडस पाहुण्याचे आगमन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ...

करिना कपूर खान आणिसैफ अली खानयांच्या घरात एका गोंडस पाहुण्याचे आगमन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 20 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता करिनाने मुलाला जन्म दिला. करिना आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप असून  दोघांच्या कुटुंबियातील मंडळी रुग्णालयात उपस्थित आहेत.करिना आणि सैफच्या मुलाला पाहाण्याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागलेली आहे. पण फॅन्सना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. बाळाची झलक कोणत्याही मीडियात येऊ नये यासाठी कपूर आणि खान दोन्ही कुटुंब खबरदारी घेत असल्याचे कळतेय. सैफ अली खान आणि करिनानेच त्यांची ही खुशखबर मीडियासोबत शेअर केली आहे. करिनाने तिच्या प्रेग्नेनसीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक समारंभाना हजेरी लावली होती. करिनाने या काळात कधीच ब्रेक घेतला नाही. यातून एक उत्तम उदाहरण तिने समाजासमोर ठेवले आहे. ती काहीच दिवसांपूर्वी मल्लाईका अरोराने आयोजित केलेल्या प्री-ख्रिस्मस पार्टीलादेखील उपस्थित होती.  सैफ आणि करिनाला त्यांचे फॅन प्रेमाने सैफिना असे म्हणतात. त्यामुळे आता त्यांच्या मुलाचे नाव काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. सैफ आणि करिनाने या मुलाचे नाव तैमूर ठेवले असून त्यांनीच मुलाचे हे नाव मीडियासोबत शेअर केले आहे. करिना आणि सैफचे प्रेमप्रकरण कुरबान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरू झाले. त्यांनी 16 ऑक्टोबर 2012ला अगदी जवळच्या नातलग आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. करिनाचे हे पहिले लग्न आहे तर सैफचा याआधी अभिनेत्री अमृता सिंगशी विवाह झाला होता. त्याला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. ​सैफ आणि करिनाला आमच्याकडून आणि आमच्या वाचकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.