Join us

​आता कॅट-फवादची जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 19:59 IST

 शाहरूख खान, आमीर खान, सलमान खान आणि  अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यांसोबत रोमान्स करून चुकलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ आता यंग ...

 शाहरूख खान, आमीर खान, सलमान खान आणि  अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यांसोबत रोमान्स करून चुकलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ आता यंग हिरोंसोबत रोमान्स करताना दिसतेय. लवकरच कॅट ‘बार बार देखो’मध्ये कॅट सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटाकडून कॅटला बºयाच अपेक्षा आहेत. यानंतर कॅट फवाद खानसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची खबर आहे. होय, करण जोहर आणि फॉक्स स्टुडिओज निर्मित चित्रपटासाठी कॅट व फवाद यांना साईन करण्यात आल्याची चर्चा आहे. हा चित्रपट पंजाबच्या पार्श्वभूमीवर आधारित लव्हस्टोरी आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत याचे शूटींग सुरु होणार असल्याचेही ऐकिवात येते आहे. कॅटरिनाला याबाबत विचारले असता तिने यावर बोलणे टाळले. सध्या काही चित्रपटांबद्दल माझी चर्चा सुरु आहे. मात्र ‘बार बार देखो’नंतर माझा कुठला चित्रपट फ्लोरवर येणार असेल तर तो ‘जग्गा जासूस’ आहे, केवळ एवढेच कॅट म्हणाली. लेट्स सी...