Join us

​आता हा अभिनेता दिसणार वडिलांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 18:13 IST

अक्षय खन्नाने रेस, हलचल, हंगामा, दिल चाहता है यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ...

अक्षय खन्नाने रेस, हलचल, हंगामा, दिल चाहता है यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने बॉर्डर या चित्रपटात साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण गेल्या काही वर्षांपासून अक्षयने चित्रपटात काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ढिश्शूम या चित्रपटात त्याने काम केले होते. पण या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच छोटी होती आणि आता तर अक्षय एका चित्रपटात पित्याच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. संजय दत्तचे आयुष्य नेहमीच वादादीत राहिले आहे. शस्त्रे बाळगण्याच्या आरोपावरून त्याने कित्येक वर्षं कारागृहातही घालवली आहेत. त्यामुळे त्याच्या वादग्रस्त जीवनावर चित्रपट बनवला जाणार असून या चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी तो सध्या संजयला अनेकवेळा भेटत असून त्याच्यासोबत भूमिकेबाबत चर्चाही करत असल्याचे म्हटले जात आहे. संजय दत्तच्या या चित्रपटात प्रेक्षकांना सुनील दत्त यांची व्यक्तिरेखादेखील पाहायला मिळणार आहे. संजयचे वडील सुनील दत्त हे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी होते. त्यामुळे त्यांची भूमिका एखाद्या चांगल्या अभिनेत्यानेच साकारावी असे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना वाटत आहे. या भूमिकेसाठी अक्षय खन्नाला विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. पण अक्षयने या भूमिकेसाठी होकार दिला की नाही याची अद्याप कोणाला कल्पना नाही. पण अक्षय हा चित्रपट करण्यास तयार झाला तर प्रेक्षकांना पहिल्यांदाच अक्षय पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे.