राहुल रॉयने इन्स्टाग्रामवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले. ज्यामध्ये त्याच्या हेअरस्टाइलपासून ते हेअरकलरपर्यंत सर्व काही बदलेले दिसत आहे. त्याने त्याच्या आगामी ‘वेलकम टू रशिया’ या चित्रपटासाठी मेकओवर केला आहे. चित्रपटात तो एका भ्रष्ट पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणार आहे. त्याची भूमिका एका अशी व्यक्तीची आहे, जो निम्मा रूसी आणि निम्मा भारतीय आहे. राहुल रॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून आॅस्ट्रेलियाला राहत आहे. मी २०१५ मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला. वास्तविक मधल्या काळात २००७ मध्ये तो काहीकाळ भारतात आला होता. याच दरम्यान त्याने बिग बॉसच्या शोमध्ये भाग घेतला होता.
दरम्यान, तब्बल १२ वर्षांच्या गॅपनंतर राहुल रॉय ‘वेलकम टू रशिया’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. या अगोदर तो ‘नॉटी बॉय’ या चित्रपटात २००६ मध्ये झळकला होता. राहुल रॉय सध्या रूसमध्ये आहे. ज्याठिकाणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, त्याचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. नितीन गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.