‘जय गंगाजल’ वादात प्रकाश झा यांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 10:26 IST
‘जय गंगाजल’ चित्रपटातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ आणि तेथील आमदार नितीन नवीन यांची प्रतीमा कथितरित्या खराब करणारे दृश्य गाळण्यासंदर्भात या ...
‘जय गंगाजल’ वादात प्रकाश झा यांना नोटीस
‘जय गंगाजल’ चित्रपटातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ आणि तेथील आमदार नितीन नवीन यांची प्रतीमा कथितरित्या खराब करणारे दृश्य गाळण्यासंदर्भात या चित्रपटाचे निर्मात प्रकाश झा यांना शुक्रवारी पाटणा उच्च न्यायालयाने नोटीस जारी केले.नवीन आणि अन्य लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर झा यांना हे नोटीस जारी करण्यात आले. झा यांना प्रत्यक्ष नोटीस सोपवावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २९ फेबु्रवारीला होणार आहे. ‘जय गंगाजल’मध्ये काही दृश्य दाखवले गेले आहेत. यात बांकीपूर व लखीसरायचा उल्लेख आहे. हा चित्रपट येत्या ४ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे.