शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे. कदाचित म्हणूनच ‘कुछ कुछ होता है’पासून ‘माय नेम इज खान’पर्यंत करणच्या अनेक चित्रपटात शाहरूख दिसला. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये करणने रणबीर कपूरला लीड रोलमध्ये घेतले खरे. पण तो शाहरूखला विसरला नाही. त्याच्या या चित्रपटात शाहरूख कॅमिओ रोलमध्ये दिसला. आता इतके प्रेम म्हटल्यावर करणचा सर्वाधिक आवडता अभिनेता कोण, असे कुणालाही विचारले तर समोरची व्यक्ती शाहरूख खान असेच नाव घेईल. पण असे नाहीयं. करण जोहरचा सर्वात आवडता अभिनेता शाहरूख नसून दुसराच कुणी आहे.
शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अॅक्टर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:23 IST