हॉलीवूड सुपरस्टार आणि कॉमेडी अॅक्शन हिरो जॅकी चैन नुकताच त्याचा आगामी चित्रपट कुंग
फू योगाच्या प्रमोशनसाठी मुंबईत येऊन गेला. या चित्रपटात जॅकी चैनसह काही बॉलिवूडचे कलाकार ही दिसणार आहेत. सोनू सूद, दिशा पटानी आणि अमायर दस्तूर हेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी चैनसोबत आमिर खान ही दिसणार होता. मात्र दंगल चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे त्याच्याजवळ वेळ नसल्याने त्यांने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. आमिरला स्टैनले टोंग निर्माती कुंग
फू योगा चित्रपटात काम करण्याची इच्छा होती मात्र तारखेंमुळे त्यांना हा चित्रपट करण्यास नकार दिला.गतवर्षी सप्टेंबरमध्ये कुंग
फू योगा चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले यावेळी आमिर दंगलच्या चित्रिकरणात बिझी होता. दंगल चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होईपर्यंत आमिर व्यस्त होता. याच दरम्यान कुंग
फू योगाचे चित्रिकरण सुरु झाले होते. आमिरला कुंग
फू योगाच्या निर्मात्याला ऐवढा वेळ थांबवून ठेवायचे नव्हते.
कुंग फू योगाचा निर्माता स्टैनल टोंग आणि आमिर खान हे चांगले मित्र आहेत. स्टैनल म्हणााला मला आमिरला कुंग फू योगात चित्रपटात आमिरला पाहायला खूप आवडले असते मात्र तो त्याच्या दंगल या चित्रपटात बिझी होता म्हणून तो या चित्रपटात काम नाही करु शकला. जेव्हा आमिर पी. के चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चायनात आला होता. त्यावेळी तो माझ्याबरोबरच असायचा. मी आमिरचा पी.के 3 इडियट्स, धूम 3 आणि आणखीन काही त्यांने अभिनय केलेले चित्रपट बघितले आहेत. मला त्याचे हे सर्व चित्रपट आवडले आहेत.
कुंग फू योगा हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.भारतात 3 फब्रेुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.