Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अंतिम'साठी सलमान खान नव्हे तर शाहरुख खान होता पहिली चॉईस, समोर आली नवी माहिती

By गीतांजली | Updated: December 14, 2020 16:40 IST

आता या सिनेमाविषयीची डिटेल्स हळू हळू समोर येत आहेत.

अलीकडेच बातमी आली होती की, सलमान खान आणि त्याचा मेहुणे आयुष शर्माने आगामी  'अंतिम: द फायनल ट्रुथ'  सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. आता या सिनेमाविषयीची डिटेल्स हळू हळू समोर येत आहेत.

'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे 'अंतिम'आयुष शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘अंतिम’ हा 2010 मध्ये रिलीज झालेल्या मराठी सिनेमा 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे. 'मुळशी पॅटर्न'ला प्रेक्षकांचा  चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'अंतिम'ध्ये आयुष एका शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका साकारतो आहे जो नंतर गँगस्टर बनतो. या सिनेमात सलमान खान एक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता सिनेमामहेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या या सिनेमाचे नाव आधी 'धाक' असे होते. बॉलिवूडच्या हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानला प्रथम या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती पण शाहरुख खानने या सिनेमास नकार दिला. वास्तविक या चित्रपटातील मुख्य भूमिका आयुष शर्माची आहे तर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका सेकेंड लीड आहे.

शाहरुखने केली 'पठाण'ची निवड जेव्हा शाहरुखला 'अंतिम'ची ऑफर देण्यात आली होती, त्यावेळी त्याला आगामी 'पठाण' सिनेमाची ऑफरही देण्यात आली होती. पण शाहरुखने या दोन्ही चित्रपटांमधून 'पठाण'ची निवड केली आणि आता तो या सिनेमाचे शूटिंग करतो आहे. शाहरुखच्या पठाणमध्ये सलमान खानदेखील एक कॅमिओ करताना दिसणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसलमान खान