Join us

जॅकलिन फर्नांडिस नाही तर या व्यक्तीमुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे ब्रेकअप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:55 IST

गेल्या अनेक दिवसांपासून बी टाऊनमध्ये आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची मोठी चर्चा आहे.  सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला अनेकांनी ...

गेल्या अनेक दिवसांपासून बी टाऊनमध्ये आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची मोठी चर्चा आहे.  सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला अनेकांनी सिद्धार्थची जॅकलिन फर्नांडिसची वाढलेली जवळीकता कारणीभूत ठरवली. ए जेंटलमॅन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ हे एकमेकांच्या जवळ आले असल्याचे बोलले जात होते. दोघांनी चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले होते. चित्रपटातील गाण्यांमध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. यानंतर आलियाने सिद्धार्थला जॅकलिनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचेदेखील बोलले जात होते. मात्र खूप कमी लोकांना सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअप मागचे खरं कारण माहिती आहे. जॅकलिनमुळे नव्हे तर आलियाचा एक्स बॉयफ्रेंड अली दादरकरमुळे दोघांचे ब्रेकअप झाले आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाचे अलीसोबतचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आलिया अली दादरकरला बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची आधी डेट करत होती. बॉलिवूडमध्ये स्टुंडट ऑफ द इअरमधून डेब्यू केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाला आणि आता पुन्हा एकदा आलिया अलीसोबत क्लॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसते आहे. नुकेतच आलियाने आपल्या ब्रेकअपबाबत मीडियात बोलताना म्हटले होती की. ''मला याबाबत काही माहिती नाही. मी राजी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पटियालाला जाण्याआधी या गोष्टीच्या चर्चेला सुरुवात झाली.''आलिया आणि सिद्धार्थ अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये एकत्र येताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. करण जोहरच्या पार्टीतसुद्धा दोघे एकत्र आले होते. त्यावेळेचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले होते. करण जोहर दिग्दर्शित स्टुंड ऑफ द इअरमधून सिद्धार्थ आणि आलियाने बॉलिवूडमध्ये एकत्र एंट्री केली होती.  दोघे बॉलिवूडमधल्या क्युट कपलपैकी एक होते. ALSO READ : ​आलिया भट्टचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अली दादरकर कोण, कुठला? जाणून घ्या संपूर्ण माहिती!आलिया सध्या मेघना गुलजार हिच्या राजी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती एका काश्मीर मुलीची भूमिका साकारणार आहे. ज्याची विवाह  पकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.