Join us  

VIDEO : नोरा फतेहीपेक्षा जराही कमी नाही तिचा डान्स पार्टनर, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क

By अमित इंगोले | Published: November 02, 2020 11:33 AM

नोरा फतेहीने या डान्स पार्टनरसोबत 'नाच मेरी राणी' गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आहे. यात ती प्रसिद्ध डान्सर अवेज दरबारसोबत थिरकताना दिसत आहे.

डान्सच्या दुनियेतील क्वीन नोरा फतेहीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या खास डान्सने धमाका केला आहे. गाणं तर तेच आहे 'नाच मेरी राणी', पण यावेळी तिचा डान्स पार्टनर गुरू रंधावा नाही तर दुसरा आहे. नोराचा हा डान्स व्हिडीओ तिच्या फॅन्समध्ये लोकप्रिय झाला असून व्हिडीओला भरभरून व्ह्यूज मिळत आहेत. 

नोरा फतेहीने या डान्स पार्टनरसोबत 'नाच मेरी राणी' गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आहे. यात ती प्रसिद्ध डान्सर अवेज दरबारसोबत थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे फॅन्स लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. (VIDEO : टेरेन्सने खास अंदाजात सर्वांसमोर व्यक्त केलं 'प्रेम', लाजून कावरी बावरी झाली नोरा फतेही...)

अवेज दरबारने आपल्या इन्स्टाग्रामवर नोरासोबत डान्ससोबतचे अनेक डान्स व्हिडीओज शेअर केले आहेत. यात दोघांच्याची डान्स कौतुक केलं जात आहे. दोघांच्या डान्स केमिस्ट्रीचीही प्रशंसा केली जात आहे. 

दरम्यान, नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं 'नाच मेरी राणी' हे गाणं २० ऑक्टोबरला रिलीज झालं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  हे गाणं रिलीज झाल्यावर केवळ १० तासातच १० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. (VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....)

तसेच नोरा आगामी 'भुज' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती आपल्या अदांनी आणि डान्सने प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. तसेच ती वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजमध्येही दिसत असते. त्यामुळे तिची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे.  

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड