Join us  

नोरा फतेहीला लागली पुन्हा मोठी लॉटरी; जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 8:24 PM

नोरा फतेहीच्या हाती फार मोठा प्रोजेक्ट नाही. पण मोठ्या प्रोजेक्टचे आयटम साँग मात्र  आहेत. होय, एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे.

नोरा फतेहीच्या हाती फार मोठा प्रोजेक्ट नाही. पण मोठ्या प्रोजेक्टचे आयटम साँग मात्र  आहेत. होय, एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे. लवकरच नोरा जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते’ या आगामी चित्रपटात ‘दिलबर...दिलबर...’ या गाजलेल्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. अलीकडे हे गाणे रिलीज झाले. सध्या तरी या गाण्यावर लोकांच्या उड्या पडताहेत. यातील नोराचा जलवा काही औरचं आहे. हेच कारण आहे की, आत्तापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.( ‘सिर्फ तुम’ या चित्रपटात हे गाणे सुश्मिता सेनवर चित्रीत करण्यात आले होते. ‘सत्यमेव जयते’मध्ये हेच गाणे रिक्रिऐट करण्यात आले असून त्यात नोरा दिसणार आहे.) ‘सत्यमेव जयते’नंतर नोरा आणखी अशाच एका मोठ्या चित्रपटात स्पेशल सॉन्ग करताना दिसणार असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘भारत’. या चित्रपटात नोराचे स्पेशल नंबर आहे. या गाण्यात नोरासोबत भाईजान सलमानही ठेका धरणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.अद्याप नोराने या प्रोजेक्टबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तसे अप्रत्यक्ष संकेत मात्र दिले आहे. मी लवकरच काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. योग्यवेळी त्याची घोषणा करेल. सध्या मी कमालीची उत्सूक असल्याचे तिने म्हटलेय. येत्या २३ जुलैपासून अली अब्बास दिग्दर्शित ‘भारत’चे शूटींग सुरु होणार आहे. या चित्रपटात सलमानशिवाय प्रियांका चोप्रा आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहेत. २०१९ मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

टॅग्स :नोरा फतेहीसत्यमेव जयते चित्रपटजॉन अब्राहमसलमान खानबॉलिवूड