Join us  

VIDEO : ना स्टेज ना पब्लिक नोरा पार्कमध्येच करू लागली जबरदस्त डान्स, फॅन्सची उडाली झोप!

By अमित इंगोले | Published: October 12, 2020 4:28 PM

दिलबर गर्ल नोरा हार्डी संधूच्या 'Naah' गाण्यावर एका डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नोरा चक्क एका गार्डनमध्ये डान्स करत आहे. 

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे डान्सचे धमाकेदार व्हिडीओही सतत व्हायरल होत आहेत. तसेच नुकतीच डान्स रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्येही दिसली होती. त्यामुळे तिची लोकप्रियता आणखीन वाढली. नेहमीप्रमाणे सध्या तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यात दिलबर गर्ल नोरा हार्डी संधूच्या 'Naah' गाण्यावर एका डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नोरा चक्क एका गार्डनमध्ये डान्स करत आहे. 

नोरा फतेहीचा हा डान्स व्हिडीओ 'मुंबई डान्सर्स' च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या गाण्यावरील नोराच्या अदा आणि खास डान्स मुव्ह्स पाहून तिचे फॅन थक्क झाले आहेत नोराचा हा व्हिडीओ आतापर्यं ६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिा आहे. नोराच्या या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत आणि तिचं कौतुक करत आहेत. (नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?')

दरम्यान, मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर नोराने इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये तिची जागा घेतली होती. आता मलायका परत आल्याने नोरा बाहेर पडली. पण इतक्या कमी दिवसातच तिच्या येण्याने या शोचा टीआरपी कमालीचा वर गेला होता. (PHOTOS: नोरा फतेहीच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे स्टनिंग फोटो)

नोरा लवकरच अजय देवगनच्या 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमात दिसणार आहे. असे मानले जात आहे की, या सिनेमात ती तिच्या डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहे. नोराने आतापर्यंत तिच्या 'दिलबर', 'कमरिया', 'गर्मी', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' सारख्या गाण्यांमधून जगाला वेड लावलं आहे. (अबब.... नोरा फतेहीच्या डान्सिंग व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग, 2 तासांतच 10 लाखाहून अधिक लोकांना पाहिला)

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूडसोशल व्हायरल