Join us

Noor song Gulabi 2.0 out: ​पाहा; सोनाक्षी सिन्हाचा ‘गुलाबी’ अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 15:09 IST

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘नूर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील ‘गुलाबी2.0’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले.

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘नूर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील ‘गुलाबी2.0’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या पार्टी साँगमध्ये सोना एका हटके अंदाजात पाहायला मिळते आहे. तूर्तात तरी लोकांना हे गाणे प्रचंड आवडलेय. खरे तर गुलाबी आँखे ऐकल्याबरोबर राजेश खन्ना यांच्या ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’ या गाण्याची आठवण येते. आर. डी. बर्मन यांचे कम्पोझिशन असलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गाण्यावर ४७ वर्षांनंतर सोनाक्षी एका वेगळ्या अंदाजात बेधूंद होताना दिसत आहे. मद्याच्या नशेत बेधूंद झालेल्या सोनाक्षीच्या अदा या गाण्यात दिसतआहेत.  तुलसी कुमार, यश नार्वेकर, अमाल मलिकने गाणं गायलं असून अमाल मलिकने संगीत दिलं आहे.  सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यात सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सोनाक्षी एक पत्रकार म्हणून काम करत असताना, तिचे आयुष्य कसे चाललेय हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अलीकडे ‘नूर’चे ट्रेलर लॉन्च झाले होते. दोन मिनिटे २१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सोनाक्षी वेंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसतेय. जी एक जर्नालिस्ट असते, परंतु स्वत:ला जोकर जर्नालिस्ट म्हणत असते.   ट्रेलरमधील  ह्यनूरह्ण तिच्या वाटेत आलेल्या प्रत्येक वस्तूला धडकते. थोडक्यात त्या वस्तूची नासधूस करते. त्यामुळे तिला स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार वाटतो.  अतिशय खोळकर नूर चक्क सनी लिओनीचा इंटरव्ह्यू करण्यासाठी धडपड करीत असते. मात्र ट्रेलरच्या अखेरीस तिच्या आयुष्यात बराचसा बदल झाल्याचे दिसून येते. ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.