Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना सिनेमा, ना जाहिराती आणि कोणताही टीव्ही शो,तरीसुद्धा कसं चालतो रेखा यांचा घरखर्च?, तुम्हीसद्धा विचारात नक्कीच पडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:25 IST

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय,चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या ...

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय,चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा.त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत.त्यामुळेच की काय बॉलिवूड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं.त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही.प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे.बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे.हे तर झालं त्यांच्या खासगी जीवनाविषयी.मात्र भानुरेखा गणेशन ते बॉलिवूड दिवा रेखा असा त्यांचा प्रवास तितका सोपा नव्हता.संघर्ष हा रेखा यांच्या जीवनात बालपणापासूनच होता.मात्र प्रत्येक परिस्थितीवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. त्यांच्या सुरुवातीच्या सावळ्या लूकमुळे निर्माते त्यांना संधी द्यायला तयार नव्हते. मात्र तरीही रेखा यांनी हार मानली नाही. स्वतःमध्ये बदल घडवत त्यांनी दो अंजाने सिनेमातून दमदार एंट्री केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री ते बॉलिवूड दिवा असा थक्क करणारा प्रवास केला.रेखा यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान मिळवलं आहे ते कुणीच मिळवू शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेखा यांनी सिनेमात काम केलेले नाही. असं असलं तरी त्याचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. रेखा यांचे आगामी काळात दोन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमांशिवाय दक्षिण भारतात त्यांची दोन घरं असून त्याचं भाडेरुपात रेखा यांना उत्पन्न मिळतं.रेखा या राज्यसभा खासदार आहेत. खासदारांना त्यांचं वेतन मिळत असतं. ते वेतन रेखा यांनाही मिळतं.बालपणापासून संघर्ष केला असल्यानं त्यांना बचतीचे महत्त्वही नक्कीच माहिती असेल. आयुष्यभरातील कमाईतून त्यांनी नक्कीच काही ना काही बचत केली असणार.याशिवाय पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं गलेलठ्ठ मानधन रेखा यांना मिळतं. रेखा या अनेक राज्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.गेल्या वर्षी त्या बिहारच्या ब्रँड अॅम्बेसेडर होत्या.त्याचेही रेखा यांना मानधन मिळतं.त्यामुळंच बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून रेखा यांची गणना होते.