‘नो ब्रेक’ फॉर तापसी पन्नू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 11:49 IST
तापसी पन्नू सध्या अनेक चित्रपटांवर काम करत असून २०१६ हे वर्ष तिच्यासाठी फारच बिझी गेले आहे. सध्या ती लंडनमध्ये ...
‘नो ब्रेक’ फॉर तापसी पन्नू!
तापसी पन्नू सध्या अनेक चित्रपटांवर काम करत असून २०१६ हे वर्ष तिच्यासाठी फारच बिझी गेले आहे. सध्या ती लंडनमध्ये साकिब सलिम यांच्या आगामी चित्रपटासाठी काम करत आहे. प्रकाश राज यांच्या दिग्दर्शनाखालील ‘तडका’ चित्रपटात तिला नंतर काम करायचे आहे.नीरज पांडे यांच्या निर्मितीअंतर्गत अनेक प्रोजेक्टमध्ये तिने काम केले आहे. ती आता लवकरच ‘पिंक ’ चित्रपटाचे प्रमोशनही सुरू करणार आहे. यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.‘गाझी’ मध्ये तिने राणा दग्गुबती यांच्यासोबत काम केले आहे. या सर्व चित्रपटातील भूमिका तिच्या एकमेकांपासून फारच वेगवेगळ्या आहेत.