Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीने स्विगीद्वारे मागवले जेवण, जेवणात आढळले झुरळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:33 IST

या अभिनेत्रीने बुधवारी सोशल मीडियावर जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

ठळक मुद्देनिवेथा पेथुराजने बुधवारी सोशल मीडियावर आपल्या जेवणाचे फोटो शेअर केले.

सध्या ऑनलाईन जेवण मागण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा खूपच चांगल्या प्रतीचे जेवण मिळते. पण काहीवेळा जेवणात काहीतरी पडलेले आढळते आणि गोंधळ उडतो. एका अभिनेत्रीने नुकतेच जेवण मागवले होते तर त्या जेवणात झुरळ आढळले.

निवेथा पेथुराजने बुधवारी सोशल मीडियावर आपल्या जेवणाचे फोटो शेअर केले. हे जेवण तिने स्विगीवरून ऑर्डर केलं होतं. बाहेरून मागवलेल्या जेवणात झुरळ सापडले. निवेथा ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने सोशल मीडियाद्वारे या स्विगीचा चांगलाच क्लास घेतला आहे.

मला याची काहीही कल्पना नाहीये की स्विगी इंडिया आणि त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या हॉटेल्समध्ये नक्की काय नियम बनवण्यात आले आहेत. मला माझ्या जेवणात दोन झुरळं मिळाली. मुनलाइट या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, त्यांना दंड ठोठावण्यात अशी तिने मागणी सोशल मीाडियाद्वारे केली आहे. तसेच स्विगीने या हॉटेलला अॅपवरून काढावे असे देखील तिने म्हटले आहे.

स्विगीने या प्रकरणाची दखल घेत निवेथाची माफी मागितली आहे आणि यावर लवकरात लवकर कारवाई करू... असे सांगितले आहे. 

टॅग्स :बॉलिवूड