Join us  

हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 10:25 AM

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. जणू काही दुसरी मुंबई भासावी, इतके सेलिब्रिटी येथे व्हॅकेशनवर आले आहेत.

ठळक मुद्देनिखील अलीकडे ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. काही दिवसांपूर्वी निखीलची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. सध्या तो आयसोलेशनमध्ये आहे.

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. जणू काही दुसरी मुंबई भासावी, इतके सेलिब्रिटी येथे व्हॅकेशनवर आले आहेत. आता व्हॅकेशन म्हटल्यावर या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचीही चढाओढ दिसतेय. सेलिब्रिटींचे स्वत:चे वेगवेगळ्या पोजमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. हे फोटो पाहून सेलिब्रिटींचे चाहते कदाचित खूश असतीलही पण बॉलिवूड अभिनेता व निर्माता निखील द्विवेदी मात्र व्हॅकेशन फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर जाम वैतागला आहे. हा सगळा मूर्खपणा असल्याचे त्याने म्हटले आहे.

पत्रकार बरखा दत्त यांच्या एका ट्वीटवर प्रतिक्रिया देताना निखीलने एक ट्वीट केले. बरखा दत्त यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालदीव व्हॅकेशन फोटोंवर नाराजी व्यक्त केली. देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, बेरोजगारी वाढत असताना सेलिब्रिटी मालदीवमधील व्हॅकेशनचे फोटो शेअर करण्यात गुंग आहेत, असे ट्वीट बरखा यांनी केले. त्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना निखील द्विवेदीनेही ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘सर्वांना असे वाटत असेल की, सेलिब्रिटी हार्टलेस आहेत. पण असे नाही. ते केवळ मूर्ख आहेत. आम्ही स्वत:त इतके गुंग आहोत की, आमच्या आजुबाजूला काय घडतेय, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, सेलिब्रिटी संवेदनाहिन नाहीत. फक्त मूर्ख आहेत,’अशा शब्दांत निखीलने आपला राग व्यक्त केला.

तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मालदिवमध्ये एन्जॉय करतायेत व्हॅकेशन, फोटो होतायेत व्हायरल

निखील अलीकडे ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. काही दिवसांपूर्वी निखीलची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. सध्या तो आयसोलेशनमध्ये आहे.सध्या दिशा पाटणी, टायगर श्रॉफपासून तर तारा सुतारिया, आदर जैनपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. या व्हॅकेशनचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टॅग्स :बॉलिवूडतारा सुतारियादिशा पाटनी