त्याचे झाले असे की, एक दिवस साधना कुठल्यातरी चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांची नजर गेली. साधनाला बघताच सुरज यांनी निर्णय घेतला की, त्यांच्या पुढच्या चित्रपटाची हिरोईन साधना असेल. जेव्हा सुरज बडजात्या साधना सिंग हिच्याकडे चित्रपटाची आॅफर घेऊन गेले, तेव्हा तिने सुरुवातीला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर तिला लोकांनी समजावून सांगितल्यानंतर तिने होकार दिला. त्यानंतर जे काही घडले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. साधनाचा ‘नदिया के पार’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. शिवाय या चित्रपटात काम करणाºया प्रत्येक कलाकाराला एक स्वतंत्र ओळख मिळाली.
या चित्रपटानंतर साधनाकडे बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर येण्यास सुरुवात झाली. चाहते तर तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असायचे. तिला बघण्यासाठी अक्षरश: चाहत्यांच्या रांगा लागायच्या. बºयाचदा तर असे झाले होते की, साधनाला पाहण्याच्या नादात चाहत्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. बºयाचशा कमी लोकांना माहिती आहे की, साधनाला अभिनयाबरोबरच गायनाचीही प्रचंड आवड आहे.
‘नदिया के पार’ या चित्रपटातील साधनाची ‘गुंजा’ ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. बºयाच लोकांनी तर त्यांच्या मुलींचे नाव ‘गुंजा’ असे ठेवण्यास सुरुवात केली होती. ‘नदिया के पार’ या चित्रपटानंतर साधनाने ‘ससुराल, तुलसी, औरत और पत्थर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. खूपच कमी काळात साधनाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळाले. मात्र अशातही ती काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. लग्न केल्यानंतर ती तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त झाली.