Nick Jonas-Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. निक अनेकदा प्रियंकावरील आपले प्रेम उघडपणे व्यक्त करत असतो. नुकतंच निकने 'गोल्डन ग्लोब्ज २०२६' मधील एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने प्रियंकाला चक्क 'राजकुमारी' असं संबोधलं. दोघांची ही केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
निकने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रियंका ही गडद निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खिडकीजवळ उभी असलेली दिसत आहे. तिला पाहून निक २००१ मधील प्रसिद्ध चित्रपट 'प्रिन्सेस डायरीज'मधील संवाद म्हणतो, "राजकुमारी, खिडकीतून बाहेर बघ, आणि जेनोव्हियामध्ये तुझं स्वागत आहे". निकचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने तर मजेशीरपणे कमेंट केली की, "जिजू, प्रिन्सेस आता क्वीन झाली आहे".
२०२६ च्या मेट गालामध्ये निक आणि प्रियंका दिसले नाहीत, ज्यामुळे चाहते थोडे नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर निकने हा जुना व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे २०१७ च्या मेट गालामध्ये हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भारतात मोठ्या थाटामाटात लग्न केले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रियंकाची बहुचर्चित 'सिटाडेल २' ही सीरिज काल ६ मे पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम झाली आहे. तसेच प्रियंका सध्या एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'वाराणसी' या चित्रपटाची तयारी करत आहे. हा भव्य चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर निक जोनास हा एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो एका अविवाहित तरुणाची भूमिका साकारणार आहे.
Web Summary : Nick Jonas shared a throwback video of Priyanka Chopra, calling her 'Princess'. Fans loved his style. The couple, who married in 2018, are adored globally. Priyanka's 'Citadel 2' is streaming; she's preparing for 'Varanasi'. Nick will star in a rom-com.
Web Summary : निक जोनस ने प्रियंका चोपड़ा का एक थ्रोबैक वीडियो साझा किया, जिसमें उन्हें 'राजकुमारी' कहा। प्रशंसकों को उनका अंदाज पसंद आया। 2018 में शादी करने वाले इस जोड़े को विश्व स्तर पर पसंद किया जाता है। प्रियंका की 'सिटाडेल 2' स्ट्रीमिंग हो रही है; वह 'वाराणसी' की तैयारी कर रही हैं। निक एक रोमांटिक कॉमेडी में अभिनय करेंगे।