Join us

लष्करी जवानाने घेतला विद्या बालनचा समाचार; ‘पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 16:58 IST

लष्करातील एका जवानावर आक्षेपार्ह वक्तव्य करून खळबळ उडवून देणाºया अभिनेत्री विद्या बालनला एका जवानाने जशास तसे उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर!

डर्टी गर्ल विद्या बालन हिचा लवकरच ‘तुम्हारी सुलु’ हा चित्रपट रिलीज होणार असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या विद्या सर्वत्र फिरत आहे. याचदरम्यान विद्याने एका लष्करी जवानाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. विद्याने तिच्या कॉलेजच्या काळातील उल्लेख करताना लष्करी जवानावर गंभीर आरोप केला होता. विद्याने टीओआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक लष्करी जवान व्हीटी स्टेशनवर उभा होता. माझ्याकडे तो बघत होता. तो सातत्याने माझ्या ब्रेस्टकडे बघत होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे बघून डोळा मारला.’विद्याने आपल्या लष्करी जवानावर केलेल्या या गंभीर आरोपानंतर सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा रंगली आहे. विद्याच्या या आरोपानंतर आता एका जवानावर एक व्हिडीओ शेअर करून विद्याला जशास तसे उत्तर दिले आहे. सध्या त्या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या जवानाने त्याचे नाव राहुल सांगवान असे सांगितले आहे. तसेच या जवानाने लष्कराची वर्दीही घातलेली आहे. या जवानाने विद्याच्या आरोपाचा समाचार घेण्यासाठी एक लांबलचक कविताच सादर केली आहे. त्याने कवितेत विद्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/fansofyouthbjp/videos/513302335707080/">दरम्यान जवानाचा हा व्हिडीओ ‘युथ बिजेपी’ नावाच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड होताच तब्बल २० हजार नेटिझन्सनी त्यास शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या तरुणाने मी भारतीय लष्कारात जवान असल्याचे म्हटले आहे. लष्करी जवानाने सादर केलेली कविताबुढ्ढों से परहेज नहीं तो थोडा धीरज धर लेती,इक जवान ने घूर लिया तो अनदेखा ही कर लेती,माना तुम पैसे लेकरही देह प्रदर्शन करती हो,टांगे, बाहें, गला दिखाकर अपना बटुआ भरती हो,पैसे लेकर जिस्म दिखाना उस पर भले शराफत क्या,इक जवान ने फ्री फंड में देख लिया तो आफत क्या,पहले दुनिया घूर रही थी ये ज़मीर तब हिला नहीं,दिक्कत शायद ये है उस जवान से पैसा मिला नही,किसने बोला था बयान तुम ऐसा दो या वैसा दो,खुल कर कहती उस जवान से घूर लिया अब पैसा दो...