Join us

सल्लूमियाँचा ‘सुल्तान’ मधील न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 10:22 IST

सध्या देशातील सर्वांत मोठा सुपरस्टार म्हणजे सलमान खान. गेल्या २० वर्षांपासून त्याने त्याचे यशस्वी करिअर बनवले आहे. स्क्रिनवरील प्रभावी ...

सध्या देशातील सर्वांत मोठा सुपरस्टार म्हणजे सलमान खान. गेल्या २० वर्षांपासून त्याने त्याचे यशस्वी करिअर बनवले आहे. स्क्रिनवरील प्रभावी वावर, पॉवरफुल व्यक्तीमत्त्व, माचो लुक्स आणि प्रामाणिक परफॉर्मन्सेस यांच्यामुळे त्याचे नाव घेतले जाते.चाहते त्याच्या स्टाईल स्टेटमेंटवर फारच फिदा असतात. नुकताच ‘सुल्तान’ मधील एक स्टील फोटो आऊट करण्यात आला आहे. या फोटोत तो पहेलवानाच्या भूमिकेत दिसत असून पायानेच प्रतिस्पर्ध्याला खेचून नेत आहे. वेल, हे तर खुपच प्रभावी आहे.पहेलवान हाताला धरून प्रतिस्पर्ध्याला बाहेर ओढतात. पण, सलमान इतरांसारखा असल्यास तो सलमान कसा असेल? अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपटात तो हरयाणवी पहलवानाच्या भूमिकेत दिसत आहे. यात अनुष्का शर्माही चित्रपटात असणार आहे.