ALSO READ : रिलीज आधीच अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेमकथा' वादात
या चित्रपटाचे ‘हस मत पगली’ हे गाणे तुफान लोकप्रीय झाले आहे. या गाण्याचे मेल आणि फिमेल असे दोन्ही व्हर्जन आपण ऐकलेत. याशिवाय या गाण्याचे ड्यूएट व्हर्जनही रिलीज केले गेलेय. अरूण भाटिया निर्मित या चित्रपटात अक्षय व भूमी मुख्य भूमिकेत आहेत. केशव आणि जया नामक व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहे. केशव व जया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नसल्याच्या कारणाने जया घर सोडून निघून जाते. आता हा ‘बखेडा’ कसा सुटतो, हे मात्र तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत तुम्ही या नव्या गाण्यातील अक्षय व भूमीचे बहरलेले प्रेम पाहायला हवे. पाहा तर आणि हे गाणे तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.