इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’च्या पाचव्या मिनी ट्रेलरमध्ये अनुष्काची अंगठी हरवल्याचे तुम्ही बघितलेत. अनुष्काची एंगेजमेंट रिंग हरवलीय आणि तिने ती शोधण्यासाठी शाहरूखला कामाला लावले आहे. ‘बीच बीच में’ या गाण्यातही याच अंगठीचा शोध सुरु असलेला तुम्हाला दिसेल. हे त्यांचे टास्क अनेक अडचणी निर्माण करते. याऊपरही अनुष्का व शाहरूखची जबरदस्त केमिस्ट्री यात दिसते. गाण्यात शाहरूख प्रचंड हँडसम दिसतोय. या गाण्यात डिस्को बीट्सवर डान्स करणारा शाहरूख पाहून तुम्हाला २००३ मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’चे ‘इट्स द टाईम टू डिस्को’ हे गाणे आठवल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे आजही नाईट क्लबमध्ये हटकून ऐकायला मिळते.
या सिनेमाचे एकूण सात मिनी ट्रेलर असून त्यातले पाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यातल्याच दुसºया मिनी ट्रेलरने वाद ओढवून घेतल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. या ट्रेलरमधील ‘इंटरकोर्स’ शब्दाच्या वापरावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता. सोबतच या शब्दाला पास करण्यासाठी एक लाख लोकांचे वोट जमा करण्याचे आदेशही मेकर्सला दिले होते. एक अनुष्का शर्मा या सिनेमात एका गुजराती मुलीची सेजलची भूमिका निभावतेय. ही सेजल युरोप फिरायला जाते आणित तिथे तिला हॅरी म्हणजेच शाहरुख भेटतो. येत्या ४ आॅगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
ALSO READ : ‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!
‘जब हॅरी मेट सेजल’च्या निमित्ताने प्रथमच शाहरूख खान, अनुष्का शर्मा व इम्तियाज अली एकत्र आले आहेत. शाहरूखला या वर्षांत एका हिटची गरज आहे. त्यामुळे शाहरूखला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत.