Join us

New Photoshoot : ​इतकी ‘ब्युटिफुल’ दीपिका पादुकोण तुम्ही कधीच पाहिली नसेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:54 IST

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटानंतर दीपिका पुन्हा एकदा ‘पद्मावती’ या चित्रपटात बिझी झालीय. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय लवकरच दीपिका एका लोकप्रीय मॅगझीनच्या कव्हरपेजवरही झळकणार आहे.

‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ हा हॉलिवूडपट रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण जागतिक पातळीवर लोकप्रीय झाली आहे. चित्रपटात ती हॉलिवूडच अ‍ॅक्शन स्टार विन डिझेल याच्यासोबत दिसतेय. अलीकडे विन डिझेल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येऊन गेला. यावेळी दीपिकाने विनचे जोरदार स्वागत केले. या हॉलिवूडपटानंतर दीपिका पुन्हा एकदा ‘पद्मावती’ या चित्रपटात बिझी झालीय. संजय लीला भन्साळींच्या  या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय लवकरच दीपिका एका लोकप्रीय मॅगझीनच्या कव्हरपेजवरही झळकणार आहे.मॅगझीनच्या फेबु्रवारीच्या एडिशनमध्ये दीपिका बॉलिवूड ते हॉलिवूड या प्रवासाबद्दल बोलणार आहे. या एडिशनला ‘हॅलो हॉलिवूड’ असे नाव देण्यात आले आहे. या मॅगझीनसाठी दीपिकाने नुकतेच फोटोशूट केले. यातील दीपिकाचे सौंदर्य पाहून तुम्हीही भान विसरल्याशिवाय राहणार नाही. या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्कींग साईटवर पोस्ट करण्यात आले आहेत. काही फोटोमध्ये दीपिकाने जेट ब्लॅक टॉप आणि लोअर घातले आहे. तर काही फोटोंमध्ये ती इनर वियर आणि जॅकेटमध्ये दिसतेय. ‘दीपिका ब्युटिफुल’ नामक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  अलीकडे दीपिका एलेन डिजेनरसच्या शोमध्ये दिसली. यावेळी पिता प्रकाश पादुकोण, स्वत:चे फिल्मी करिअर आणि विन डिझेलवरील क्रश अशा अनेक गोष्टींवर दीपिका बोलली. एकंदर काय तर दीपिका आता फुल्ल स्पीडमध्ये आहे. तिचा थांबवणे आता केवळ अशक्य आहे. शेवटी दीपिकाने यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचावे, हीच तर तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. आमची इच्छाही यापेक्षा वेगळी नाही. आमच्या शुभेच्छाही दीपिकासोबत आहेत.Related stories : For Adult Users Only !! दीपिका पादुकोणचा हा Morphed फोटो तुम्ही पाहिलातं का?HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: लॉस एंजिलिस येथील xXx प्रीमियरमध्ये दीपिका पदुकोणची सेक्सी अदा