Join us

Never Miss : ​गोठवणा-या थंडीत ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरच्या हॉट अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:52 IST

रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. सध्या उर्मिला काय करतेय? तर ती हिमालयात आहे. होय, उर्मिला हिमालयात आहे आणि हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीत योगाभ्यास करतेय.

रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. सध्या उर्मिला काय करतेय? तर ती हिमालयात आहे. होय, उर्मिला हिमालयात आहे आणि हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीत योगाभ्यास करतेय. उर्मिला तिच्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक आहे. त्यामुळेच चित्रपटांपासून दूर गेली असली तरी फिटनेसपासून ती दूर जाऊ शकलेली नाही. याचाच परिणाम म्हणजे, लडाख येथे ६ अंश सेल्सिअसच्या तापमानात उर्मिला योगा करतेय. हिमालयातील पँगाँग सरोवराच्या बाजूला योगा करतानाचे काही फोटो उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्मिला वेगवेगळ्या योगमुद्रेत दिसतेय. विशेष म्हणजे या फोटोंच्या अल्बमला उर्मिलाने ‘माय योगा डायरी’ असे नाव दिले आहे. नव्वदच्या दशकात उर्मिलाच्या नावाचा बोलबाला होता. ‘रंगीला’ या चित्रपटाने उर्मिलाला नवी ओळख दिली. यानंतर ती बॉलिवूडची ‘रंगीला’ गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.  गतवर्षी ३ मार्चला उर्मिला विवाहबंधनात अडकली होती. एका खासगी विवाहसोहळ्यामध्ये मोहसिन अख्तर मिर याच्यासोबत विवाह केला होता. एका हॉटेलात अगदी मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत उर्मिला विवाहबंधनात अडकली होती. उर्मिलाच्या अचानक आलेल्या लग्नाच्या बातमीने त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अख्तर मिर हा उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर इंटरनेटवर नेटिझन्सनी उर्मिलाला सर्वाधिक सर्च केले होते. याच कारणामुळे २०१६ या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींच्या यादीत उर्मिलाच्या नावाचा समावेश होता. आता उर्मिलाचे योगाभ्यास करतानाचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना किती सर्च केले जाते, ते आता बघूच!!​ Also read : उर्मिलाही विवाहबंधनातउर्मिलाचा पती आहे तरी कोण?