Join us

सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसवर फडकणारा हा झेंडा कोणता? नेटकऱ्यांचा प्रश्न एकदाचा सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:18 IST

करिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पतौडी पॅलेसवर एक झेंडा दिसत आहे.

अभिनेत्री करिना कपूर सध्या ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये गेली आहे. यावेळी तिने पतौडी पॅलेसमधील व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  करिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पतौडी पॅलेसवर एक झेंडा दिसत आहे. या झेंड्याने अनेकांचे लक्ष वेधले. "हा झेंडा कोणता आहे?" असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन करिनाला विचारला आहे. तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आपण हा झेंडा कोणता आहे, हे जाणून घेऊयात. 

करिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पतौडी पॅलेसकडे जाताना सैफ अली खान दिसतोय. यावेळी पॅलेसवर एक झेंडा दिसत आहे. पण, पतौडी पॅलेसवरील हा झेंडा देशाचा तिरंगा नव्हे तर दुसराच कोणता तरी झेंडा आहे. तर हा ध्वज पतौडी संस्थानचा आहे. पतौडी हे भारतातील एक छोटेसे संस्थान होते. 1804 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत त्याची स्थापना करण्यात आली होती. या संस्थानाचे पहिले नवाब हे सैफ अली खानचे पूर्वज होते. जे अफगाणिस्तानातून भारतात आले होते. 

 हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हे पतौडी पॅलेस आहे.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर पतौडी संस्थान भारतात विलीन झालं होतं. पतौडीचे शेवटचे शासक इफ्तिखार अली खान यांच्या निधनानंतर हा राजवाडा त्यांचा मुलगा मन्सूर अली खान आणि त्याची पत्नी शर्मिला टागोर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आता सैफ अली खान हा पतौडींचा वारसदार असल्याने त्याला तो झेंडा वापरण्याचा अधिकार आहे. म्हणून आजही या आलिशान महालावर पतौडींचा झेंडा फडकत आहे. करीना आणि सैफ त्यांच्या कुटुंबासोबत अनेक समारंभ पतौडी पॅलेसमध्ये साजरे करतात. 

 

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडसेलिब्रिटीकरिना कपूर