Join us  

Urvashi Rautela: नेटिझन्सनी रिषभ पंतच्या नावावरून उर्वशी रौतेला हिला केलं ट्रोल, तिनं दिलं असं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 7:55 PM

Urvashi Rautela: सौंदर्यासोबत उर्वशी रौतेला हिला तिच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जाते. अशातच एका नेटिझन्सने सोशल मीडियावर उर्वशी रौतेला हिला Rishabh Pantच्या नावावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वशीनेही त्याला जोरदार उत्तर दिले.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कमी वयामध्ये लक्षणीय यश मिळवलं आहे. तिने आपल्या यशाने देशाचं नाव परदेशातही उंचावलं आहे. उर्वशी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लुक्सबाबतही चर्चा होत असते. हल्लीच उर्वशी रौतेला हिच्या इन्स्टाग्रामवर ४५ दशलक्ष फऑलोअरचा आकडा गाठला आहे. त्यानंतर तिने खतरनाक स्टंट करून हे यश साजरे केले. मात्र ट्रोलर्सनी इथेही तिची पाठ सोडली नाही.

सौंदर्यासोबत उर्वशी रौतेला हिला तिच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जाते. अशातच एका नेटिझन्सने सोशल मीडियावर उर्वशी रौतेला हिला रिषभ पंतच्या नावावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वशीनेही त्याला जोरदार उत्तर दिले. पंतच्या १०० धावा काल पाहिल्यात कि नाही, असं एका युझरने उर्वशी रौतेला हिला विचारले होते. त्यावर उर्वशीने प्रत्युत्तर देताना म्हटले की, ओह तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की पँट (पँटचा इमोजी लावला) हो, मी पाहिलं, कारण सर्वजण ती परिधान करतात. तसेच मला यामध्ये १०० रुपयेही मिळाले.

उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत यांचे नाव नेहमीच जोडले जाते. दोघांमध्ये एकवेळ मैत्री होती. तसेच हे दोघेही एकमेकांच्या नात्यात असल्याची चर्चाही सुरू होती. मात्र अचानक दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर ब्लॉक केले. असे का झाले याबाबत कुणालाही माहिती नाही. मात्र तेव्हापासून दोघांनाही एकमेकांच्या नावावरून चिडवले जात आहे.

उर्वशी रौतेला हिच्या प्रोजेक्टचा विचार केल्यास तिने मागच्यावेळी Miss Universe Pageant 2021 जज म्हणून काम केले होते. त्याबरोबरच ती मिस युनिव्हर्सला जज करणारी ती सर्वात कमी वयाची सेलेब्रिटी बनली होती. त्याशिवाय उर्वशीने सुपरस्टार Mohamed Ramadan याच्यासोबत एका इंटरनॅशनल साँगमध्येही काम केले होते.  

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतबॉलिवूड