अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एकेकाळी त्याच्या प्लेबॉय किंवा कॅसानोव्हा इमेजसाठी खूप प्रसिद्ध होता. तो दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींना डेट करत होता आणि त्याची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असायची. त्याचे वडील ऋषी कपूर यांनीही एकदा मीडियासमोर कबूल केले होते की रणबीर एकाच वेळी चार मुलींना डेट करत होता. नंतर, आलिया भट रणबीरच्या आयुष्यात आली, जिच्याशी त्याने लग्न केले आणि आता दोघेही राहाचे पालक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, एकेकाळी रणबीरला एका अभिनेत्रीने थेट फ्रेंड झोन केले होते? हा तो काळ होता जेव्हा रणबीर सिंगल होता आणि त्याने त्याच्या एका सहकलाकाराला डेटवर येण्यासाठी विचारले होते, परंतु तिने स्पष्ट नकार दिला.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ही गोष्ट समोर आली. रणबीर आणि त्याची सहकलाकार अनुष्का शर्मा यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. एका मुलाखतीदरम्यान, रणबीरने दोघांमधील संभाषणादरम्यान एक इंटरेस्टिंग खुलासा केला. रणबीरने हसून सांगितले की, अनुष्का 'फ्रेंड-झोनिंगची चॅम्पियन' आहे आणि ती मुलांना सहजपणे प्लेटोनिक झोनमध्ये ठेवते. त्याने असेही सांगितले की कपूर आडनाव असलेला एक मुलगा अनुष्काच्या प्रेमात पडला होता, परंतु अनुष्काने त्याला स्पष्टपणे सांगितले की ते फक्त मित्र आहेत.
अनुष्का झाली चकीतरणबीरच्या हावभावावरून तो स्वतःकडे इशारा करत होता, ज्यामुळे इतर लोक आणि अनुष्का चकीत झाले आणि वातावरण हलके झाले. यावर अनुष्काने उत्तर दिले की, ती एका लष्करी कुटुंबातून येते, जिथे तिचे वडील सशस्त्र दलात होते. म्हणूनच तिने नेहमीच जेंडर न पाहता लोकांशी संबंध निर्माण केले. तिने सांगितले की, तिने मुली आणि मुलं दोघांशीही मैत्री केली आहे आणि कधीही जेंडरच्या दृष्टिकोनातून मैत्रीकडे पाहिले नाही.
दोन्ही कलाकार जगताहेत आनंदी जीवन रणबीर आता आलिया भटसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे, तर अनुष्का शर्माने २०१७ मध्ये इटलीमध्ये विराट कोहलीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. काहीही असो, रणबीर आणि अनुष्का दोघांचीही मुले खूप गोंडस आहेत आणि चर्चेत येत असतात.