Join us

​नेहा शर्माचे twitter अकाऊंट हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:29 IST

अभिनेत्री नेहा शर्मा ही सुद्धा हॅकिंगची बळी ठरलीयं. होय, अलीकडे नेहाचे twitter अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले. तिच्या अकाऊंटवर महिलांचे न्यूड ...

अभिनेत्री नेहा शर्मा ही सुद्धा हॅकिंगची बळी ठरलीयं. होय, अलीकडे नेहाचे twitter अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले. तिच्या अकाऊंटवर महिलांचे न्यूड फोटो शेअर होत असल्याचे नेहाला आढळले. यानंतर लगेच आपले अकाऊंट हॅक झाल्याचे tweet तिने केले. सोबतच अकाऊंटवरील अश्लिल पोस्टसाठी माफीही मागितली. मूळ बिहारी असलेली नेहा शर्मा ‘क्या सूपर कूल है हम’ आणि ‘यंगिस्तान’ सारख्या चित्रपटांत दिसली. ‘हेरा फेरी’ सीरिजच्या तिसºया चित्रपटात म्हणजेच ‘हेराफेरी३’मध्येही ती दिली. आता नेहा ‘तुम बिन’च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी १५०० स्क्रीन टेस्ट घेतले होते. त्यानंतर कुठे ही भूमिका नेहाच्या वाट्याला आली. २ आॅगस्टलाच ‘कबाली स्टार’ रजनीकांत यांचे twitter अकाऊंट हॅक झाले होते.