Join us  

नेहा कक्करचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल, धमाकेदार डान्स पाहून फ्लॅट झाले फॅन्स

By अमित इंगोले | Published: October 05, 2020 5:08 PM

सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

नेहा कक्कर जेवढी चांगली सिंगर आहे तेवढीच चांगली डान्सरही आहे. हे तुम्ही अनेक पाहिलं असेल. नेहा कक्करची गाणी यूट्यूबवर धमाका तर करतातच, सोबतच तिचे डान्सचे व्हिडीओही फॅन्सना पसंतीस पडतात. सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 

सिंगर नेहा कक्कर या व्हिडीओत आपल्या कमाल डान्स मुव्ह्सने सर्वांचे होश उडवत आहे. व्हिडीओत नेहा कोरिओग्राफर आदिल खानसोबत डान् करताना दिसत आहे. नेहा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला असून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. (या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर?  कोण आहे तिचा भावी पती?)

नेहा कक्कडचं नवीन गाणं 'तारों के शहर' हे तिच्या फॅन्सना चांगलंच आवडलंय. हे गाणं रिलीज होताच याने यूट्यूबवर धमाका केलाय. नेहाने याआधी दिलबर, काला चश्मा, गरमी, आंख मारे, सेकंड हॅन्ड जवानी, कोका कोला यांसारख्या गाण्याने खूप लोकप्रियता मिळवली.

दरम्यान, नेहा कक्कड लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.  ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता नेहाचा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे नाव आहे. रोहनप्रीत सिंह. रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. याच रोहनप्रीतसोबत नेहा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. (Neha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा)

नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा व रोहनप्रीत या महिन्याच्या अखेरिस लग्न करू शकतात. दिल्लीत हा विवाह सोहळा होणार असल्याचे कळते. यासंदर्भात नेहाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रोहनप्रीतच्या मॅनेजरने मात्र यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही सुद्धा या लग्नाच्या चर्चा ऐकल्या आहेत. पण नेहा व रोहनप्रीत यांनी अलीकडे एक सिंगल एकत्र केले. कदाचित त्यामुळे त्यांचे नाव जोडले जात असावे. तूर्तास रोहनप्रीतचा लग्नाचा कुठलाही इरादा नाही,’ असे मॅनेजरने स्पष्ट केले. आता खरच म्युझिक व्हिडीओमुळे या चर्चा सुरु झाल्यात की नेहा व रोहनप्रीत खरोखरच लग्न करणार, हे लवकरच कळेल. सूत्रांनी मात्र लग्नाची बातमी पक्की असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :नेहा कक्करबॉलिवूडसोशल व्हायरल