Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू सिंग झाल्या भावूक, फोटो शेअर करून म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:19 IST

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या सोशल मीडियावरून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांची 30 एप्रिलला प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्यांच्या आठवणीत इमोशनल झाला आहे. ऋषी कपूर यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या पत्नी नीतू सिंग नेहमीच त्यांच्या सोबत राहिल्या. पण आता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू आपल्या पतीला खूप मिस करत आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या सोशल मीडियावरून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नीतू सिंग एकट्या पडल्या आहेत. नुकताच त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला नीतू यांनी लिहिले की, 'आमच्या कथेचा शेवट'

1975 मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. खऱ्या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली. ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला.

नीतू अगदी 14 वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांना डेट करण्यास सुरुवात केली. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतू यांना सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला इरिटेट करत असे. मात्र हळूहळू हाच राग प्रेमात रुपांतरीत झाला. ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली. अफेअरच्या काहीच वर्षांनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री तातडीने गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल केले होते. ६७ वर्षीय ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :ऋषी कपूरनितू सिंग