नीरजाची आई सोनमला म्हणते,‘लाड्डो’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:48 IST
सध्या सोनम कपूरभोवती एक नाव फिरतंय, ते म्हणजे,‘नीरजा’ चं. दिग्दर्शक राम माधवानी यांनी अभिनेत्री सोनम कपूर हिने नीरजाच्या भूमिकेला ...
नीरजाची आई सोनमला म्हणते,‘लाड्डो’
सध्या सोनम कपूरभोवती एक नाव फिरतंय, ते म्हणजे,‘नीरजा’ चं. दिग्दर्शक राम माधवानी यांनी अभिनेत्री सोनम कपूर हिने नीरजाच्या भूमिकेला न्याय दिला असे सांगितले. ‘नीरजा भनोत’ या फ्लाईट अटेंडंट असलेल्या जिगरबाज युवतीची भूमिका सोनमने साकारली. राम माधवानी यांना विचारण्यात आले की,‘सोनम हिच त्यांची पहिली चॉईस होती का? तर ते म्हणाले,‘ हो. तिने ज्यावेळी मला चित्रपटासाठी हो म्हटले. तेव्हा मी फार खुश झालो.’ ती चंदीगढला नीरजाच्या आईला भेटायली गेली तेव्हा तिची आई सोनमला म्हणाली,‘यह तो ‘लाड्डो’ आ गयी घर पे.’ नीरजाचे टोपण नाव ‘लाड्डो’ होते. माधवानी म्हणाले,‘ हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी स्वप्न आहे. प्रेक्षक चित्रपटावर खुप प्रेम करतील असा माझा विश्वास आहे.’