नीरज वोरा 'आयसीयू' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:26 IST
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक नीरज वोराला ब्रेन स्ट्रोक झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची तब्येत गंभीर असून दिल्लीतील एम्स ...
नीरज वोरा 'आयसीयू' मध्ये
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक नीरज वोराला ब्रेन स्ट्रोक झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची तब्येत गंभीर असून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचा रक्तदाब प्रचंड वाढला असून तो काही तासांपासून बेशुद्धावस्थेतच आहे. आयसीयुत त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नीरजला रुग्णालयात दाखल केल्यापासून इंडस्ट्रीतील अनेकजण त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. फिरोज नाडियाडवालाने नुकतीच रुग्णालयात जाऊन नीरजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच परेश रावलने नीरजला चांगल्यातले चांगले उपचार देण्यात यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.नीरजचा जन्म भूजमध्ये झाला. त्याचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार पंडित नानलाल वोरा आहेत. त्याच्या वडिलांना चित्रपटाबद्दल प्रचंड राग असल्याने नीरजला लहानपणी ते चित्रपटही पाहून देत नसे. पण त्याला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याच्या आईने त्याला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी पाठिंबा दिला.त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती नाटकांमधून केली. त्यानंतर त्याने सर्कस या मालिकेत काम केले. नीरज खऱ्या अर्थाने रंगिला या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. या चित्रपटाची कथा त्याने लिहिली होती. त्यानंतर खिलाडी 420 या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले.फिर हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याचेच आहे. सध्या तो हेरा फेरी 3 या चित्रपटावर काम करत होता. त्याने दिग्दर्शनासोबतच रंगिला, विरासत, मन, हर दिल जो प्यार करेगा अशा अनेक चित्रपटात कामदेखील केले आहे.