Join us  

“मुलगी, नवा मुलगा, मुलाची आई…” नीना गुप्तांनी शेअर केला लेकीच्या लग्नाचा फोटो, हटके आहे कॅप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 5:44 PM

Neena Gupta Shares Masaba Gupta Wedding Photo : नीना यांनी लेकीच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोपेक्षा या फोटोला नीना यांनी दिलेलं कॅप्शन खास आहे. 

साठी ओलांडलेल्या नीना गुप्तांचा (Neena Gupta) उत्साह अगदी तरूणाईला लाजवेल असा आहे.  नीना गुप्ता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. अगदी बेली डान्सपासून तर ग्लॅमरस, बोल्ड फोटोंपर्यंत त्यांच्या पोस्ट पाहून चाहतेही थक्क होतात. सध्या नीना जाम खूश्श आहेत. कारणही तसंच आहे. एकुलत्या एक लेकीचं लग्न झालंय, ती आता संसाराला लागलीये. होय, अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने आज अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. सत्यदीप व मसाबा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. अगदी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मसाबाच्या लग्नाचे फोटो सेाशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नीना यांनीही लेकीच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोपेक्षा या फोटोला नीना यांनी दिलेलं कॅप्शन खास आहे. 

मसाबाच्या लग्नात नीना गुप्ता व त्यांचे पती, विवियन रिचर्ड्स, सत्यदीपची आई व बहीण उपस्थित होते. या सर्वांचा एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. या फोटोला नीना यांनी भन्नाट कॅप्शन दिलं आहे. “मुलगी, नवीन मुलगा, मुलाची आई, मुलाची बहीण, मुलीचे वडील, मी आणि माझा नवरा”, असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, मसाबा ही नीना गुप्ता व  वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक आहे.  वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता नीना यांनी त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला . 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियनने. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. विवियन नीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण त्याला आपले लग्नही तोडायचे नव्हते. त्यामुळे त्याने नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला.

लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केलं नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झालं. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला.  पुढे वयाच्या ५० व्या वर्षी नीना गुप्ता यांनी लग्न केलं. त्यांच्या पतीचं नाव विवेक मेहरा आहे.

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूड