नीना यांची ही पोस्ट त्यांची मुलगी मसाबाने तिच्या अकाऊंटवरून शेअर केली. शिवाय आईबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ‘मला काम मागायला ना लाज वाटते, ना भीती, असे मी काही दिवसांपूर्वीच कुणाला तरी म्हणाले होते. आई काम मागत असेल तर निश्चितपणे हे ‘खानदानी’ म्हणायला हवे. माझ्या आईने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेती माझी ६२ वर्षीय आई. ती कायम मला प्रेरणा देत आलीय. काम तुम्हाला म्हातारे होण्यापासून रोखते, असे ती मला नेहमीच सांगत आलीय. माझ्या आईसारखे काम कुणीच करू शकत नाही. ती पीआर करू शकत नाही. तिच्यामते, तिचे काम हाच तिचा पीआर आहे. हे जग माझ्या आईची प्रतिभा नाकारू शकत नाही, ’असे मसाबाने लिहिले आहे.
आईबद्दल मसाबाने लिहिलेली ही पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही आवडली. प्रेरक पोस्ट, असे प्रियांकाने लिहिले. केवळ प्रियांकाच नाही तर अनेकांनी नीना गुप्ता व मसाबा यांच्या पोस्टला दाद दिली.
नीना गुप्ता यांनी ‘खलनायक’,‘जाने भी दो यारों’,‘कमजोर कडी’ आणि ‘गांधी’ यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. शिवाय छोटा पडदाही गाजवला आहे.