Join us

​‘इंदू सरकार’ हुबेहुब संजय गांधींसारखा दिसणार नील नितीन मुकेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:43 IST

‘इंदू सरकार’ या मधूर भांडारकर दिग्दर्शित चित्रपटाची उत्सूकता सगळ्यांच असणार. या चित्रपटाबद्दल एक नवी बातमी द्यायची झाल्यास, यात अभिनेता ...

‘इंदू सरकार’ या मधूर भांडारकर दिग्दर्शित चित्रपटाची उत्सूकता सगळ्यांच असणार. या चित्रपटाबद्दल एक नवी बातमी द्यायची झाल्यास, यात अभिनेता नील नितीन मुकेश संजय गांधी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यात तो हुबेहुब संजय गांधी सारखा दिसतोय.  या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे, हे सगळ्यांना ठाऊक होते. पण संजय गांधीची भूमिका कोण साकारणार, याबद्दल लोकांना उत्सुकता होती. पण संजय गांधी यांच्या भूमिकेविषयी रंगलेल्या चर्चेवर मधुर भांडारकर  मौन बाळगून होते. अखेर ही भूमिका नील नितीन मुकेश साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया विनोद, नील नितीन मुकेश या दोन कलाकारांशिवाय चित्रपटामध्ये किर्ती कुल्हारी आणि ‘अहिल्या’ फेम टोटा रॉय चौधरी देखील दिसणार आहेत. अनु मलिक आणि बप्पी लाहिरी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट यावर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप पक्की झालेली नाही. ३ जानेवारीला मधूर भांडारकर यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना हेलावून सोडण्याची क्षमता असल्याचे बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटले होते. नील नितीन मुकेश अलीकडेच विवाह बंधनात अडकला.गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात नील दिसला होता. त्याने या चित्रपटात नकारात्मक भूमिका केली होती. पारंपारिक ठेवणीतील त्याची भूमिका असली तरी समीक्षकांनी व प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. मात्र याचा त्याला फार फायदा झाला नाही.