Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नजदिकीयाँ' मध्ये शाहिद-आलिया आले जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:33 IST

शा हीद कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'शानदार' मुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट २२ ऑक्टोबर ...

शा हीद कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'शानदार' मुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून पोस्टर्स आणि गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. दोघांमध्ये खुपच उत्कृष्ट प्रकारची केमिस्ट्री पहावयास मिळणार आहे. एकसोबतच अनेक शाहीद-आलिया रोमांस करतांना दिसतील. या गाण्याचे विशेष म्हणजे यात ब्लॅक अँण्ड व्हाईट विंटेज थीमवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला निखिल पॉल जार्ज आणि नीती मोहन यांनी गायले आहे. याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. अमित त्रिवेदी हे संगीत दिग्दर्शक आहेत. शाहीदने हे गाणे त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहे. याच गाण्यात शाहीदचे वडील पंकज कपूर आणि बहीण सना कपूर देखील आहेत. शाहीद व आलिया लवकरच दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचा चित्रपट 'उडता पंजाब' मध्ये एकमेकांसोबत काम करणार आहेत.