दरम्यान, या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी साहनी, व्यवसाय विश्लेषक नित्या थुम्मालाचेट्टी, शिक्षिका तुलिका कीर आणि १६ वर्षांची भारतीय विद्यार्थिनी प्रियंका रॉय यांच्या नावांचाही समावेश आहे. या सर्व महिलांना बीबीसीने २०१७ मधील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. नवाजुद्दीनने आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पुढे २०१२ मध्ये त्याने अनुषा रिजवीच्या ‘पीपली लाइव्ह’मध्ये साकारलेल्या पत्रकाराच्या भूमिकेमुळे खºया अर्थाने ओळख मिळाली. याच वर्षी त्याला स्पेशल ज्युरीकरिता राष्टÑीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, नवाजच्या आईचे वय ६५ वर्षे इतके असून, त्या उत्तर प्रदेशमधील एक छोट्याशा गावात राहतात. अशातही त्यांनी रूढी परंपरांना बगल देत अतिशय धाडसाने त्यांनी समाजात काम केले. आपल्या आईचे नाव या यादीत आल्याने नवाज सध्या खूश आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने याबाबतचा आनंदही साजरा केला आहे. दरम्यान, नवाज सध्या इंडस्ट्रीमधील एक होतकरू आणि दमदार अभिनेता म्हणून ओळखला जातो. उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून त्याने अनेक भूमिका अविस्मरणीय केल्या आहेत.
}}}} ">A Lady who showed courage against all odds being in a conservative Family from a small village-My Mother #100MostInfluentialWomenInTheWorldpic.twitter.com/rtE9VnEP74— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) September 27, 2017