Join us

बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचे नाव; ट्विट करून व्यक्त केला आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 18:52 IST

बीबीसीने नुकतेच शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची आई मेहरूनिस्सा सिद्दीकी यांच्या नावाचा ...

बीबीसीने नुकतेच शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची आई मेहरूनिस्सा सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश आहे. बीबीसीने त्यांना भारतातील प्रभावशाली महिला म्हणून गौरविले आहे. नवाजने याचा आनंद साजरा करताना आईसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोमध्ये हे मायलेक एकमेकांच्या खाद्यांवर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहेत. फोटो शेअर करताना नवाजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘छोट्या शहरातून आणि परंपरा जपणाºया परिवारातून असलेल्या एका महिलेने कठीण परिस्थितीचा सामना करून हिम्मत दाखविली. माझी आई’दरम्यान, या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी साहनी, व्यवसाय विश्लेषक नित्या थुम्मालाचेट्टी, शिक्षिका तुलिका कीर आणि १६ वर्षांची भारतीय विद्यार्थिनी प्रियंका रॉय यांच्या नावांचाही समावेश आहे. या सर्व महिलांना बीबीसीने २०१७ मधील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. नवाजुद्दीनने आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पुढे २०१२ मध्ये त्याने अनुषा रिजवीच्या ‘पीपली लाइव्ह’मध्ये साकारलेल्या पत्रकाराच्या भूमिकेमुळे खºया अर्थाने ओळख मिळाली. याच वर्षी त्याला स्पेशल ज्युरीकरिता राष्टÑीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. दरम्यान, नवाजच्या आईचे वय ६५ वर्षे इतके असून, त्या उत्तर प्रदेशमधील एक छोट्याशा गावात राहतात. अशातही त्यांनी रूढी परंपरांना बगल देत अतिशय धाडसाने त्यांनी समाजात काम केले. आपल्या आईचे नाव या यादीत आल्याने नवाज सध्या खूश आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने याबाबतचा आनंदही साजरा केला आहे. दरम्यान, नवाज सध्या इंडस्ट्रीमधील एक होतकरू आणि दमदार अभिनेता म्हणून ओळखला जातो. उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून त्याने अनेक भूमिका अविस्मरणीय केल्या आहेत.