Join us

अचानकच रेड लाइट एरियात पोहोचला नवाजुद्दीन सिद्दिकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 14:46 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी सध्या त्याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात तो बाबू ...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी सध्या त्याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात तो बाबू नावाच्या शूटरची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटातील त्याची इमेज पाहता, तो अतिशय हटके पद्धतीने प्रमोशन करणाºयावर भर देत आहे. त्यासाठी तो चक्क लखनऊ येथील रेड लाइट एरियामध्ये गेला होता. अर्थात हा चित्रपटाच्या शूटिंगचाही एक भाग होता. वास्तविक रेड लाइट एरियातील हा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना प्रचंड अचडणींचा सामना करावा लागला. निर्मात्यांनी सांगितले की, हा सीन शूट करण्यासाठी लोकेशन ठरविणे सर्वात जास्त डोकेदुखी होती. अशात रेड लाइट एरियाची निवड करण्यात आली. मात्र याठिकाणी शूटिंग करणे खूपच अवघड होते. कारण याठिकाणी शूटिंग करताना तेथील लोकांनी प्रचंड विरोध केला होता. त्यांची रीतसर परवानगी घेतल्यानंतरच त्यांच्या मदतीने हा सीन शूट करण्यात आला. निर्मात्यांनी सांगितले की, लखनऊमधील या रेड लाइट एरियात लहान मुलांची आणि महिलांची संख्या प्रचंड आहे. या सीनमध्ये त्या परिसरातील लोकही सहभागी झाल्याचे प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. या सीनला रिअल टच मिळावा म्हणूनच निर्मात्यांनी तेथील स्थानिक लोकांना सीनमध्ये सहभागी होण्यास विनंती केली होती. दरम्यान, नवाजुद्दीन याला या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. बंदूकचे स्पेशल ट्रेनिंग घेताना त्याला जेम्स बॉन्डचे चित्रपटही बघावे लागले. चित्रपटाची कथा नवाजचे मित्र, शत्रू आणि त्याचे प्रेम याच्या अवतीभोवती फिरणारी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले असून, किरण श्याम श्रॉफ आणि अश्मिथ कंदर निर्माता आहेत.