Join us

​नवाजचे स्वप्न भंगले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 17:40 IST

दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकीने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न भंगले आहे. उत्तर भारतात दसºयाच्या दिवशी सादर ...

दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकीने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न भंगले आहे. उत्तर भारतात दसºयाच्या दिवशी सादर करण्यात येणाºया रामलीलाचा आपणही एक भाग असावे असे त्याचे स्वप्न आहे.निराश झालेला नवाजुद्दीन हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याचे निश्चय त्याने ट्विटरवर व्यक्त केला आहे. नवाजुद्दीन लहानपणापासूनच उत्तर भारतात दसºयाच्या दिवशी सादर करण्यात येणाºया ‘रामलीला’मध्ये काम करण्याची इच्छा बाळगून आहे. बॉलिवूडमध्ये जरी त्याने अनेक मोठ्या कलावंतांसोबत काम केले असले तरी त्याला अद्याप गल्लोगल्ली सादर होणाºया ‘रामलीला’मध्ये काम करता आले नाही. मात्र या वर्षी त्याने आपल्या गावी सादर केल्या जाणाºया रामलीलामध्ये मारिचची भूमिका साकारण्याची पूर्ण तयारी केली होती. यासाठी त्याने कॉस्च्युमसह डॉयलॉग देखील पाठ केले होते. मात्र शिवसेनेने नवाजुद्दीनचा समावेश असलेल्या रामलीला सादरीकरणाचा विरोध केला. यामुळे स्थानिक प्रशासनाने नवाजुद्दीनने काम करू नये असे सांगितले. यामुळे नवाजुद्दीनच्या पदरी निराशा पडली. या सादरीकरणातून त्याला बाहेर पडावे लागले. हे दु:ख त्याने ट्विट करून आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहे. आपल्या रिहर्सलचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘‘माझे लहानपणापासून असलेले स्वप्न भंग पावले आहे. मात्र मी पुढील वर्षी सादर केल्या जाणाºया रामलीलाचा भाग असेल, पहा माझी रिहर्सल’’.}}}} ">http://पाकिस्तानी कलाकारांना फेव्हर करण्याच्या कारणाहून नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या अनेकांच्या टारगेटवर आहे. या कारणामुळेच शिवसेनेने विरोध केला आहे. आता खरच त्याचे स्वप्न पूर्ण होते का? हे तर येणारा काळच ठरवेल.