नर्गिस वजन वाढवणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:23 IST
नर्गिस फाखरी तिच्या फिटनेसविषयी खुपच जागरूक आहे. तिचे म्हणणे आहे की, एखाद्या चित्रपटात जर तिच्या भूमिकेसाठी वजनवाढीची अट असेल ...
नर्गिस वजन वाढवणार नाही!
नर्गिस फाखरी तिच्या फिटनेसविषयी खुपच जागरूक आहे. तिचे म्हणणे आहे की, एखाद्या चित्रपटात जर तिच्या भूमिकेसाठी वजनवाढीची अट असेल तरी ती वजन वाढवणार नाही.एका स्टोअरच्या लाँचिंगसाठी आलेली नर्गिस फाखरी म्हणाली,' वजन वाढवणे आणि कमी करणे हे मुलांसाठी ठीक आहे. पण मुलींसाठी ते योग्य नाही. मी जास्तीत जास्त फिट राहणे पसंत करेन. पण, मला असे वाटत नाही की मी चित्रपटांत वजन वाढवेल. मी कधीच वजन वाढवणार नाही. ''रॉकस्टार' पासून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी नर्गिस फाखरी सध्या पूर्व क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन वर बायोपिक 'अजहर' साठी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात अजहरची दुसरी पत्नी संगीता बिजलानीचा रोल करत आहे.नर्गिसला विचारण्यात आले की, संगीता बिजलानीकडून काही टिप्स घेतल्या का?त्यावर ती म्हणाली,' मी फक्त माझे काम करत आहे आणि आऊटडोअर ची शूटिंग करत आहे. टिप्सविषयी मी नक्की नाही.'